मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक गेले कित्येक दिवस आरोप करत आहेत. या सगळ्या आरोपांवर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. 'निनावी पत्र कुणीही लिहू शकतं, पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने समोर यावं, अभिनेत्री आणि NCB अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषदेत माहिती दिली.
तसेच क्रांती पुढे म्हणाली की,'आरोप करणाऱ्या व्यक्तींचा थोडा रिसर्च कमी पडला, आणखी करायला हवा होता.' असं म्हणत क्रांती रेडकरने आरोप करणाऱ्या व्यक्तींना टोळा लगावला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होत आहे. यावर क्रांती म्हणाली की,'माझ्या सासऱ्यांनी सगळी खरी कागदपत्रे सादर केली आहेत. एवढंच नव्हे तर समीर यांच्या गावातील प्रत्येक व्यक्तीचं जात प्रमाणपत्र बघू शकता.', असं देखील क्रांती रेडकर म्हणाली.
आरोप करणाऱ्या व्यक्तीने लाच घेत असल्याचे आरोप कोर्टात सिद्ध करावेत. आरोप करणाऱ्या व्यक्तीने कोर्टात या गोष्टी सिद्ध कराव्यात. अशा आरोपांना आम्ही महत्व देत नाही.
समीर वानखेडे एक सच्चा सेवक आहे. समीर वानखेडे सत्याच्या मागे असतात. ते सच्चाईने काम करतात. यामुळे इतरांना आपलं काम करता येत नाही. म्हणून समीरला बाजूला करण्यासाठी ही कटकारस्तान केली जात आहेत.
तसेच मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण आपल्याच महाराष्ट्रात आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत. राज्याच्या बाहेरून आम्हाला शुभेच्छा आणि सपोर्टचे मॅसेज येत आहेत. हे महाराष्ट्रात देखील होत आहे. महाराष्ट्रातूनही सपोर्ट आहे. पण ही गोष्ट त्रासदायक आहेत. आम्हाला महाराष्ट्रात धमक्याचे फोन येत आहेत, असं देखी क्रांती रेडकरने सांगितलं.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झालेत. चौकशीसंदर्भात ते दिल्लीत उपस्थित झालेत. दरम्यान वानखेडेंच्या समर्थनार्थ दिल्लीकर रस्त्यावर उतरले. त्यांनी एनसीबी मुख्यालय समोर नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी करत समीर वानखेंडंना पाठिंबा दर्शवलाय.