मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सर्व सण नियमांचे पालन करत साजरे झाले. मात्र यंदाच्या वर्षी लालबागचा राज विराजमान होणार आहे. राज पुन्हा येत असल्यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. कोरोनाच्या नियमांचं आणि सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करत लालबागच्या राजाची मुर्ती स्थापित करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी 4 फुटांची मुर्ती स्थापित कण्यात येणार आहे.
याठिकाणी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे भक्तांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आलं आहे. सामाजिक भान राखून "माझा गणेशोत्सव माझी जबाबदारी" या संकल्पने अंतर्गत "माझा राजा येतोय" असं म्हणत यंदाच्या वर्षी सर्वांचा लाडका बाप्पा विराजमान होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.