मुंबईत एकाच आठवड्यात लेप्टोने घेतला तिसरा बळी

मुंबईत पावसापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे या पावसाळ्याशी संबंधित आजारांचेही नेहमीप्रमाणे आगमन झाले आहे.

Updated: Jul 1, 2018, 10:53 AM IST
मुंबईत एकाच आठवड्यात लेप्टोने घेतला तिसरा बळी title=

मुंबई: एकाच आठवड्यात मुंबईत लेप्टोने तिसरा बळी घेतला आहे. त्यामुळे मुंबईत लेप्टो पाय पसरतो आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. मालाडमधील एका २१ वर्षीय तरूणीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. ही घटना २७ जूनला घडली. दरम्यान, या आधी कुर्ला आणि गोवंडीतही लोप्टोमुळे प्रत्येकी एक बळी गेला आहे. तर, लेप्टोची लागण झालेल्या इतर ५ रूग्णांवर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लेप्टोस्पायरोसिस होण्याची कारणे

प्रामुख्याने उंदीर किंवा इतर कोणत्याही लेप्टोस्पायरोसिसने बाधीत प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यातून मनुष्यास लेप्टोस्पायरोसिस आजार शकतो.

 डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे आगमन

दरम्यान, मुंबईत पावसापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे या पावसाळ्याशी संबंधित आजारांचेही नेहमीप्रमाणे आगमन झाले आहे. जून महिन्यात डेंग्यूचे २१ रूग्ण आढळले असले तरी सुदैवानं एकाचाही डेंग्यूनं मृत्यू झालेला नाही. परंतु डेंग्यूसदृश्य तापाच्या २९७ केसेस पालिकेच्या विविध रूग्णालयात या महिन्यात दाखल झाल्या आहेत...तर ग्रँस्टृोचे ७७९ रूग्ण आढळले आहेत.