Lockdown: राज्यात आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडता येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

Updated: Apr 13, 2021, 09:28 PM IST
Lockdown: राज्यात आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडता येणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राज्यात आता क़डक निर्बंध जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. लढाई जिंकण्यासाठी एकत्र येण्याचं सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

- अधिकृत फेरीवाल्यांना ५०० रुपये

- फेरीवाले ५ लाख लाभार्थी

- शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत देणार

- लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत

- सात कोटी लोकांना मोफत धान्य

- हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार

- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार

- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट

- बांधकाम मजुरांना १५०० रुपये, १२ लाख 

- घर कामगारांनाही मदत देतोय

- अधिकृत फेरीवाल्यांना ५०० रुपये

- फेरीवाले ५ लाख लाभार्थी

- शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत देणार

- लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत

- सात कोटी लोकांना मोफत धान्य

- हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार

- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार

- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट

- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी

- उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी 

- पुढील १५ दिवस संचारबंदी

- येणे जाणे पूर्ण बंद

- आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही

- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद

- सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार

- त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार

- वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार

- शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील

- बँका, आर्थिक संस्था,  अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार

- अत्यावश्यक आस्थापना सोडून सर्व आस्थापना बंद राहतील.

- लोकल, बस सेवा सुरु फक्त अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फक्त सुरु राहणार

- राज्यात भयंकर परिस्थिती आहे. हा वेळ हातातून निघून गेला तर आपल्याला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही.

- राज्यात ऑक्सीजनची कमतरता आहे. 100 टक्के ऑक्सिजन आरोग्य सेवेत वापरला जात आहे.

- बेड्स मिळत नाहीये. रेमेडिसीवरची प्रचंड मागणी वाढली आहे. 

- एअर फोर्सच्या मदतीन ऑक्सिजन आणण्याची मदत करावी. पंतप्रधानांकडे मागणी करणार.

- जीएसटीसाठी 3 महिने मुदतवाढ देण्याची मागणी करणार आहे.

- कोविडवर आपण नियंत्रणम मिळवून दाखवले होते. पण आता प्रचंड रुग्णवाढ होत आहे. 

- आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे. पण म्हणून स्वस्थ नाही बसलेलो.

- रुग्णवाढ भयावह आहे. औषधांची कमतरता जाणवत आहे.
- येत्या काळात आरोग्य सुविधा वाढवत आहोत.

- सेवाभावी संस्थांनी पुढे आलं पाहिजे.
- सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो. उणीधूनी काढू नका. आता राजकारण केलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही.
- हे फार मोठं संकट आहे. एकत्र आलो तरच नियंत्रण मिळवू शकतो.
- निर्बंध हे केवळ आपल्यासाठीच आहेत.

- राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू. 144 कलम लागू करण्यात आले आहे.
- उद्या रात्री 8 वाजेपासून नवे निर्बंध होणार लागू