फडणवीसांच्या चौकशीचे विधिमंडळात उमटणार पडसाद; अर्थसंकल्पाचा आजचा दिवस गाजणार

अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशीवरून विधीमंडळात पडसाद उमटणार आहेत.

Updated: Mar 14, 2022, 08:09 AM IST
फडणवीसांच्या चौकशीचे विधिमंडळात उमटणार पडसाद; अर्थसंकल्पाचा आजचा दिवस गाजणार title=

मुंबई : Maha Budget session 2022: अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशीवरून विधीमंडळात पडसाद उमटणार आहेत. विधीमंडळात भाजप आक्रमक होत आंदोलन करणार असल्याची शक्यता आहे. नवाब मलिकांचा राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. तर विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी केलेले आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज उत्तर देणार आहेत.

आज-उद्या फडणवीस आणखी एक राजकीय बॉम्ब टाकणार असल्याचं सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केलंय. त्यामुळे फडणवीस काय बोलतात..कोणाला टार्गेट करतायत याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडाफोड केलेल्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्ट्रिंग ऑपरेशन व्हिडीओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री याप्रकरणी निवेदन देण्याची शक्यता आहे.