मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय बजेट आज सादर करण्यात आले. या बजेटमध्ये सामान्यांना दिलासा देणाऱ्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थीनींसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली.
मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण तालुक्यातील मुलींना मोफत एसटी प्रवास. यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या नावाने नव्या योजनेची घोषणा
-@AjitPawarSpeaks https://t.co/4kRSl5SH2k#maharashtrabugdet2021— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 8, 2021
मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण तालुक्यात मोठी तरतूद करण्यात आली. मुलींना प्रवासाचा ताण वाटू नये म्हणून मुलींना मोफत एसटी प्रवास सुविधा देण्याची घोषणा अजित पवारांनी या अर्थसंकल्पात केली आहे.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या नावाने ही योजना अंमलात आणण्यात येणार आहे. या योजनेंर्तगत विशेष बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महिला व बालशक्ती योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. (Womens Day : महिला दिनानिमित्त अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा)
महाअर्थसंकल्प अधिवेशन २०२१-२२ pic.twitter.com/VWOwXxAoDk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 8, 2021
या योजने अंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी मोफत बस प्रवास करता येणार आहे, असं अर्थसंकल्पात अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी १५०० पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले.