मुंबई : काही दिवसांपूर्वीच शिंदे- फडणवीस सरकारचा लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर पार पडला. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री कोण असणार ही बाब अखेर सर्वांसमोर आली. त्यानंतर आता कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याचीच उत्सुकता रंगली.
(CM Eknath shinde ) शिंदे गटाच्या मंत्र्यांचं खातेवाटप निश्चित झाल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, MSRDC ही खाती असतील, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात येणार आहे. दादा भुसेंकडील कृषीखातं कायम राहणार असून, संजय राठोड यांना पुन्हा एकदा वनमंत्रालय मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहेत शिंदे गटाच्या मंत्र्यांची संभाव्य खाती...
1.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- नगरविकास आणि एमएसआरडीसी
2. उद्योग खातं- उदय सामंत
3.कृषी मंत्रीपद - दादा भुसे
4. पाणीपुरवठा खातं -गुलाबराव पाटील
5. राज्य उत्पादन खातं- शंभूराज देसाई
6.शालेय शिक्षण किंवा उच्च तंत्र शिक्षण खातं- तानाजी सावंत
7 वनं खातं- संजय राठोड
8.पर्यावरण,पर्यटन आणि राजशिष्टाचार खातं- दिपक केसरकर
9. अल्पसंख्यांक खातं- अब्दुल सत्तार
10. फलोत्पादन व रोजगार हमी खातं- संदिपान भुमरे