मुंबई : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहे.
या बैठकीत पोलिसांना सिडकोची ४००० घरं उपलब्धं करून देण्यासाठी आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याचा शुभारंभ करण्याबाबत चर्चा होत आहे. सोबतच बकरी ईद संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे बैठकीआधी नेत्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बकरी ईदसाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. मात्र, या नियमावलीवर काही मुस्लीम नेते नाराज आहेत. त्यामुळे काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीसह समाजवादीचे नेते देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली आहे.