Sharad Pawar Security : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात अधिक काळजी घेतली जाणार आहे. पुढील काही दिवस पवार कुटुंबियांची सुरक्षा देखील वाढवली जाण्याची शक्यता आहे. गृह विभाग (Home Ministry) याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. काल शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे.
एसटी कामगारांनी (ST workers) काल अचानक शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या घरावर धडक दिली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कोणालाही या गोष्टीची माहिती नव्हती. त्यामुळे गृहविभागाच्या अपयशावर देखील टीका होत आहे.
एसटी कामगार आंदोलकांनी काल शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेक आंदोलन केलं होतं. पण त्यावेळी शरद पवार घरी नव्हते. पण पवार कुटुंबातील इतर लोकं घरात होते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आंदोलनाची माहिती मिळताच त्या देखील सिल्व्हर ओकवर पोहोचल्या होत्या. त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं होतं. घरात माझी आई आणि मुलगी आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली होती.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या आंदोलनामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कामगारांच्या संपाला यामुळे खिळ बसली आहे. एसटी कामगारांना पोलिसांनी आझाद मैदानातून हिसकावून लावलं आहे.