तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज

अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता. 

Surendra Gangan Updated: Mar 27, 2018, 04:53 PM IST
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज title=

मुंबई : अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता. 

जुलैच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंग समितीने  शिक्षेबाबत निर्णय दिला होता. गुडेवार अमरावती महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी सुनील देशमुख यांना डावलून पंतप्रधान आवस योजनेतील लाभार्थीची यादी जाहीर केली होती.

सुनील देशमुख यांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर गुडेवार यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन देशमुख यांचा दावा खोडून काढला होता लोकप्रतिनिधींची जनमानसात प्रतिमा मलिन केल्याचा विधानसभेचा ठपका ठेवण्यात आला.