Shiv Sena : शिवसेनेची मातोश्रीवर तडकाफडकी बैठक, कारण काय?

Maharashtra Political Crisis : राजकीय सत्तासंघर्षात मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

Updated: Aug 3, 2022, 08:21 PM IST
Shiv Sena : शिवसेनेची मातोश्रीवर तडकाफडकी बैठक, कारण काय? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन झालं असलं तरी सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा अजूनही कायम आहे. शिंदे सरकार सातत्याने शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतेय. या सर्व राजकीय सत्तासंघर्षात मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. (maharashtra political crisis shiv sena calling urgent meeting on matoshree due to state government cancel bmc 2022 election struture)

का बोलावली बैठक? 

राज्य मंत्रिमंडळ बैठक दुपारी पार पडली. या बैठकींमध्ये अनेक निर्णयासह राज्य सरकारने मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 2017 ची प्रभाग रचना ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ठाकरे सरकारला हा मोठा फटका असल्याचं म्हटलं जातंय.

या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. रात्री साडे आठच्या सुमारास मातोश्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

बैठकीत कशावर होणार चर्चा? 

राज्य सरकारने मुंबई पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 2017 प्रमाणे घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेचे मनसुबे हाणून पडल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेकडून राज्य सरकारच्या या निर्णायाला विरोध करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. 

तसेच शिंदे सरकारच्या या निर्णयाला कायदेशीर पातळीवर आव्हान देता येईल का, या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.