चर्चा तर होणारच! 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर

Ajit Pawar Future CM Banner: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स लागले आहेत.. विशेष म्हणजे या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आलाय...  हे बॅनर्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतायत..

राजीव कासले | Updated: Jul 21, 2023, 01:19 PM IST
चर्चा तर होणारच! 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर title=

Ajit Pawar Future CM Banner OF Varsha Bunglow: कौन बनेगा मुख्यमंत्री? अशी स्पर्धाच सध्या राज्याच्या राजाकारणात रंगली आहे. राज्याचे राजकारण हे मुख्यमंत्रीपद (Chief Minister) या एकाच विषयाभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं आणि शिंदे-फणडवीस सरकारशी (Shinde-Fadanvis Government) हातमिळवणी केली आणि अजित पवार यांच्या गळात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली. इतकंच नाही तर त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही आल्या. पण अजित पवार समर्थकांच्या मनात आजही अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशीच इच्छा असल्याचं दिसतंय. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पण या बॅनर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

काय आहे बॅनरवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनर्स लावण्यात आले आहेत. पण या बॅनर्सवर वाढदिसांच्या शुभेच्छांबरोबरच लिहिलेल्या आणखी एका वाक्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या बॅनरवर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. बंड करण्याच्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची  इच्छा बोलून काय दाखवली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. 

अजित पवार यांच्या सासरवाडीतही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. धाराशीवमधल्या तेर गावात भावी मुख्यमंत्री म्हणून चक्क अजित पवारांचे पोस्टर झळकले होते. धाराशीवमधलं तेर ही अजित पवारांची सासरवाडी.  'तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले मोठमोठाले बॅनर त्यांच्या सासरवाडीतल्या चौकाचौकात झळकले होते. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेही फोटो बॅनरवर होते. अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच  एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते. 

शरद पवार गट आक्रमक
दरम्यान, अजित पवार गटाचं निलंबन करण्याच्या मागणीवर शरद पवार गट (Sharad Pawar Group) आक्रमक झालाय. अजित पवार गटाच्या निलंबनाबाबत आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेत.  राहूल नार्वेकर यांची भेट घेऊन निलंबनासाठी दाखल केलेल्या अर्जावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. अध्यक्षांनी अजित पवार गटावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी प्रामुख्यानं चर्चा होणार असल्याचं समजतंय.. तसंच सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक व्यवस्था कशी असावी यावरही चर्चा होणार असल्याचं कळतंय..