विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! यंदा मामाच्या गावाला जाण्याचा प्लान रद्द

शिक्षण विभागाकडून आदेश जारी, राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी

Updated: Mar 28, 2022, 07:20 PM IST
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! यंदा मामाच्या गावाला जाण्याचा प्लान रद्द title=

मुंबई : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी, पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मामाच्या गावाला किंवा परदेशात पिकनिकला जाण्याचा प्लान करत असाल तर जरा थांबा. हा प्लान तुम्हाला काहीसा पुढे ढकलावा लागणार आहे. 

कारण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टा रद्द करुन एप्रिल महिन्यात पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरु होतं. ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता. 

त्यामुळे विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात पूर्ण वेळ शाळा सुरु करण्यात आल्या. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटनेनंही मागणी केली होती. त्यानुसार आता परीक्षा संपल्यानंतरही पूर्ण एप्रिल महिना तसंच रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. 

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना गावी जाण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे.