Maharashtra Corona Guidelines | राज्यात वाढता कोरोना, नवी नियमावली जाहीर

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली (Maharashtra Corona Guidelines) जाहीर केली आहे.  

Updated: Jan 8, 2022, 08:50 PM IST
Maharashtra Corona Guidelines | राज्यात वाढता कोरोना, नवी नियमावली जाहीर title=

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली (Maharashtra Corona Guidelines) जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी ही उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) करण्यात येणार आहे. (maharashtra state government announces night curfew and new guideline due to increasing corona patients in state guideline will be implemented to midnight 10 january 2022)  

राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहेत. 

काय बंद असणार?

राज्यात मैदानं, पिकनिक स्पॉट, स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच  शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.  

हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

हॉटेलवर निर्बंध घालण्यात आली आहेत. सुधारित नियमावलीनुसार, एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेनेच हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवता येणार आहेत. 

हॉटेल रेस्टॉरंटमध्येही दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांनाच परवानगी असणार आहे. तसेच होम डिलीव्हरी पूर्ववेळ सुरु राहिल.  

तसेच राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही डोस झालेलं असणं बंधनकारक असणार आहे. तसेच आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असायला हवा.