सत्तास्थापनेचा पुढचा अकं राजभवनात, राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार

Updated: Jun 27, 2022, 06:16 PM IST
सत्तास्थापनेचा पुढचा अकं राजभवनात, राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा पुढचा अंक आता राजभवनात सुरु होणार आहे. कोरोनातन बरे झालेले राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Sing Koshyari) आता अॅक्शनमोडमध्ये आलेले आहेत. राज्यपाल लवकरच बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात हे आदेश राज्यपाल देऊ शकतात. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट किंवा एखादा आमदार आज संध्याकाळपर्यंत सध्याच्या सरकारकडे बहुमत नाही असं पत्र राज्यपालांना पाठवण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारकडे बहुमत आहे की नाही यासाठी राज्यपाल फ्लोअर टेस्टसाठी बोलावू शकतात.

विशेष म्हणजे राज्यपालांनी असे आदेश दिले आणि शिंदे गट त्यात सहभागी झालं नाही तरी भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. कारण बहुमताचा 144 चा आकडा कमी होताना दिसतोय. 

शिंदे गटाबरोबर शिवसेनेचे आणि अपक्ष असे जवळपास 50 आमदार आहेत. ते जर सरकारमधून बाहेर पडले तर बहुमताचा आकडा कमी होतोय. 

महाराष्ट्रातील या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या भूमिकेवरही सर्वाचं लक्ष आहे. भाजपशासित राज्यातील गुवाहाटीमधील बंडखोर आमदारांना ठेवण्यात आलं आहे. यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमेटीची बैठक होत आहे.