मुंबई : मनसेत गटबाजीचं राजकारण यापुढे मला नकोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. यापुढे पक्षातल्या प्रत्येकाला त्यांनी करायच्या कामांची आचारसंहिता असेल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत माटुंगा यशवंत नाट्यमंदिरात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱयांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मुंबईत मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. पदाधिकारी मेळाव्याला शिशिर शिंदे वगळता सर्व नेते उपस्थित होते.
मुंबईतील बैठकांमध्ये मला स्थानिक पदाधिकऱयां पासून ते नेत्यांपर्यंत गटबाजी आढळली. यापुढे कार्यकर्ते, पदाधिका-यांसाठी पक्षकार्याची एक यंत्रणा असेल, तुम्हाला मला आता फसवता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. मी पक्षाच्या नेत्यांना दूर केले अशा बातम्या मध्यंतरी आल्या, पण पक्षात कुणाला ठेवायचे कुणाला काढायचे हा माझा अधिकार, असंही राज यांनी पदाधिक-यांना ठणकावून सांगितलं.