मनिषा आणि मिलिंद म्हैसकरांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचं आगमन

IAS अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांनी वर्षाभरापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा गमवला. 

Updated: Aug 23, 2018, 08:20 AM IST
मनिषा आणि मिलिंद म्हैसकरांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचं आगमन title=

मुंबई : IAS अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांनी वर्षाभरापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा गमवला. वयाची 45 ओलांडल्यालेल्या या दांम्पत्याच्या आयुष्यात आता पुन्हा जुळ्या चिमुकल्यांचं आगमन झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे. 

आयव्हीएफच्या माध्यमातून जुळ्यांचा जन्म 

गेल्या वर्षी जुलै महिन्यात म्हैसकर दांम्पत्यांचा मुलगा मन्थनने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. अकाली मुलाच्या जाण्यामुळे घरात आलेले रितेपण दूर करण्यासाठी डिसेंबर महिन्यात त्यांनी आयव्हीएफच्या माध्यमातून पुन्हा बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आयव्हीएस आणि सरोगसीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात आता जुळ्यांचं आगमन झालं आहे. आता जुळ्या मुली झाल्या आहेत. 

एकुलत्या एक मुलाची मुलाची आत्महत्या 

मन्थन म्हैसकर या 18 वर्षीय मुलाने मित्राला भेटायला जातो असं सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र मलबार हिल परिसरात दरिया महल इमारतीवरून त्याने आत्महत्या केली. मन्थनचा जागीच मृत्यू झाला होता. ​मनीषा म्हैसकर या शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव तर मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेमध्ये आहेत.