मंत्रालयात उडी मारून आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mantralaya Floor Security: सुरक्षा जाळीवर उड्या मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येतात. कोणत्याही माळ्यावरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न होतो.  मध्यभागी लावण्यात आलेल्या जाळीमुळे आंदोलक जाळ्यांवर उड्या मारतात. त्यांना बाहेर काढताना पोलिसांची दमछाक होते.

Updated: Sep 27, 2023, 05:35 PM IST
मंत्रालयात उडी मारून आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय  title=

Mantralaya Floor Security: राज्याची प्रशासन व्यवस्था मंत्रालयातून चालते. विविध महत्वाच्या विभागाचे कार्यालये आणि अधिकारी येथे भेटतात. म्हणून राज्यातील नागरिक आपले प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात येत असतात. येथे येऊन, वारंवार निवेदने करुनही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. वारंवार अशा घटना समोर येत असतात. यासाठी मंत्रालय प्रशासन विभागाने महत्वाचा निर्णय घेतल आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मंत्रालयात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या व्हरांड्यात आता सुरक्षा जाळी बसवण्यात येत आहे. विविध मागण्यांसाठी अनेक जण मंत्रालयात येतात आणि मागण्या पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून ही जाळी बसवण्यात आलीय.

सुरक्षा जाळीवर उड्या मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येतात. कोणत्याही माळ्यावरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न होतो.  मध्यभागी लावण्यात आलेल्या जाळीमुळे आंदोलक जाळ्यांवर उड्या मारतात. त्यांना बाहेर काढताना पोलिसांची दमछाक होते.  आत्महत्येचे असे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रत्येक माळ्यावरील वऱ्हांड्यात सुरक्षा जाळ्या लावण्यात येत आहेत.  अशाप्रकारचा जीआर मंत्रालयातून काढण्यात आला. त्यानंतर तात्काळ यावर कार्यवाही करण्यात आली. 

मंत्रालयात प्रवेशाकरता निर्बंध, पटोलेंचा आरोप 

एकीकडे सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाकरता निर्बंध आणले जातायेत तर दुसरीकडे दलालांचा मात्र मंत्रालयात मुक्त संचार आहे असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. मंत्रालयजवळच्या निर्मल बिल्डींगमध्ये या सरकारचा सर्वात मोठा दलाल बसतो, या दलालाचं रेकॉर्डिंग काँग्रेसकडे असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. येत्या अधिवेशनात भांडाफोड करणार असल्याचा इशाराही पटोलेंनी दिलाय.