मराठा आरक्षण उपसमितीची विधीज्ञांशी चर्चा

१७ मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Updated: Feb 29, 2020, 12:16 PM IST
मराठा आरक्षण उपसमितीची विधीज्ञांशी चर्चा
फाईल फोटो

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक शनिवारी पार पडली. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी उपस्थित होते. 

अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. बैठकीला एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अॅडव्होकेट शिंदे, मराठा आरक्षण कामकाज उपसमितीचे सचिव शिवाजी जोंधळे, उपसचिव गुरव हे अधिकारीही उपस्थित होते. 

१७ मार्चला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणाविरोधात काही जणांनी याचिका केलीय त्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.