मेट्रो ३ च्या कामाला वेग, वरळीतलं भुयारीकाम पूर्ण

मेट्रो ३ या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्ग असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम वेगात पूर्णत्वाकडे चाललं आहे. 

Updated: Jan 29, 2020, 01:53 PM IST
मेट्रो ३ च्या कामाला वेग, वरळीतलं भुयारीकाम पूर्ण

मुंबई : मेट्रो ३ या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्ग असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम वेगात पूर्णत्वाकडे चाललं आहे. मुंबईत वरळी इथे वरळी मेट्रो स्टेशनच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज हा महत्त्वाचा टप्पा पार झाला. भुयारीकरणासाठी आणलेल्या टनेल बोअरिंग मशिनने वरळी स्टेशनपर्यंत भुयारीकरण पूर्ण केलं.