Mhada Deposit : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी...मुंबई म्हाडा लॉटरी 2022 (Mumbai MHADA Lottery 2022) ची वाट पाहत असताना म्हाडा एक मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी आपल्याला काही रक्कम ही Deposit करावी लागते. या Deposit रक्कमेसंदर्भात म्हाडा आता महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत (Deposit) रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधीन आहे. ही रक्कम नेमकी किती असावी याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्जासोबत उत्पन्न गटाप्रमाणे जी रक्कम भरतो किती आहे हे आपण पहिले जाणून घेऊयात. सध्या मुंबई-ठाण्याच्या सोडतीसाठी (Mumbai-Thane lottery) अत्यल्प गटासाठी 5,000 रुपये, अल्प गटासाठी 10,000 रुपये, मध्यम गटासाठी 15,000 रुपये आणि उच्च गटासाठी 20,000 रुपये अशी अनामत रक्कम आहे. या अनामत रक्कमेनुसारच मुंबई मंडळाची शेवटची 2019 ची सोडत काढण्यात आली होती. (Mhada Lottery 2022 Deposit amount increase nmp)
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये घराच्या एकूण रक्कमेच्या 5 ते 10 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून घेण्याचा विचार करत आहेत. लवकरच यासंबंधीचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज येतं असतात, त्यामुळे म्हाडामध्ये घर घेण्यासाठी स्पर्धा वाढतं आहे. Deposit रक्कम कमी असल्यामुळे गरजू आणि सर्वसामान्य इच्छुक घर घेण्यापासून वंचित राहतात. यावर तोडगा काढण्यासाठी म्हाडाकडून Deposit रक्कम वाढविण्याचा विचार सुरु आहे. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्यांना कुठलाही फायदा होणार नाही, उलट त्यामुळे गरजू इच्छुक घर घेण्यापासून वंचित राहतील. कारण सर्वसामान्यांनी एवढी मोठी रक्कम आणायची, हा प्रश्नच आहे. ही रक्कम वाढल्यास सर्वसामान्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.