अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!

MHADA Lottery 2024 : कोकण मंडळाचा धमाका. फक्त ठाणेच नव्हे, तर आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी सामान्यांना उपलब्ध करून दिलं जाणार हक्काचं घर. तेसुद्धा अगदी खिशाला परवडणाऱ्या...  

सायली पाटील | Updated: Sep 28, 2024, 09:06 AM IST
अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!  title=
Mhada lottery 2024 get homes in thane and vasai for just 20 lakhs latest update

MHADA Lottery 2024 : स्वप्नांतलं घर जेव्हा प्रत्यक्षात खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांच्याच खिशावर ताण येतो. कैक वर्षं मेहनतीनं कमवलेला पैसा या घरासाठी, कर्जासाठी खर्च होणार असतो. अशा वेळी एखाद्या पद्धतीनं घराच्या दरात कपात शक्य होते का, याचसाठी मंडळी प्रयत्न करताना दिसतात. या सर्वच मंडळींच्या प्रयत्नांना आता यश येणार आहे. मदत होईल ती म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या आगामी योजनेची. 

अधिकृत माहितीनुसार म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं सुमारे 8 हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं दसऱ्याच्या आधीच अनेकांच्या स्वप्नांना बळ मिळणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 

म्हाडाकडून 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील 213 घरांची प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात जारी केली जाील. यानंतर 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील 7 हजार घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या या सोडतीमध्ये खासगी बिल्डरमार्फत मिळालेल्या 993 घरांचा समावेश असेल. या घरांपैकी बहुतांश घरं वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील. या घरांच्या किमती 20 लाखांपर्यंत असल्यामुळं ही सोडत अनेकांसाठीच मोठी मदत करताना दिसेल. 

हेसुद्धा वाचा : MHADAच्या मुंबईतील 2,030 घरांसाठी आले 1 लाखांहून अधिक अर्ज पण 'इतक्यांनीच' भरलं सिक्योरिटी डिपॉझिट

 

सध्या म्हाडाच्या वतीनं 2030 घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानचा तिथं कोकण मंडळांनंही सोडतीची तयारी केली असून, म्हाडाची घरं, रहिवाशांच्या तक्रारी या सर्व परिस्थितीचा आढावा घेत म्हाडानं हे सर्व प्रश्न विचाराधीन घेतले आहेत. म्हाडाच्या वतीनं ठाणे, वसई आणि टिटवाळा येथे सोडत जाहीर केली जाणार असल्यामुळं कमी उत्पन्न असणाऱ्या तरीही हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी मदत होणार असून, ही मंडळीही आता स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करताना दिसतील. तेव्हा आता या सोडतीला इच्छुकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.