मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

Updated: Feb 2, 2018, 08:28 AM IST
मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी title=

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

सुनावणीस नकार

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एकबोटेंवर ॲट्रॉसिटी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी एकबोटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. मात्र त्यांनी या प्रकरणाची सुनावणी आपल्या समोर घेणं योग्य ठरणार नसल्याचं सांगत सुनावणीला नकार दिला. 

आज होणार सुनावणी

त्यामुळे आज दुस-या न्यायमूर्तींसमोर एकबोटेंच्या अर्जावर सुनावणी होईल. याआधी पुणे सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यामुळे, एकबोटेंनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय.