मनसेकडून मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप

अमेरिकेत होणा-या कार्यक्रमावरुन गायक मिकासिंग वादात अडकलाय

Updated: Aug 6, 2017, 12:19 AM IST
मनसेकडून मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप title=

मुंबई : अमेरिकेत होणा-या कार्यक्रमावरुन गायक मिकासिंग वादात अडकलाय.. 12 ऑगस्टला मिकासिंग अमेरिकेतपाकिस्तानी कलावंतांसमोर एक कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात पाकिस्तानचा स्वातंत्रदीन साजरा केला जाणार आहेत त्यामुळे मिका मनसेच्या रडावर आलाय. मनसेंनं या कार्यक्रमावर आक्षेप घेत मुंबईत मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप व्यक्त केलाय.

वसई
वसईतही महाराष्ट्र नव निर्माण सेनेने आज गायक मिका सिंग याचा पूतळा जाळलाय. मिका सिंग पाकिस्तान च्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात गानार आहें. मिका सिंग ला पाकिस्तान चा एवढा पुळका का। असा सवाल मनसे नं उपस्थित केला आहें. वसईच्या नवघर बस डेपो पासून मिका सिंग च्या पुतळयाचि  धिंड काढ़ून  त्याचा पूतळा जाळला . मिका सिंग याने भारतात येवू देनार नाहीं. असा इशाराही यावेळी देण्यात आलाय..