मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 4, 2023, 10:37 AM IST
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज  title=

MRVC Recruitment 2023: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदा मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती (MRVC Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या ई-मेलवर पाठवावा. अर्ज पाठविण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.  अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास, अर्ज अपूर्ण असल्यास, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद करण्याचा अधिकार संस्थेकडे राहील. 

राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

उमेदवारांनी आपले अर्ज career@mrvc.gov.in यावर पाठवायचे आहेत. 13 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्या. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी

मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी,  माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील. असिस्टंट लायब्रेरिअन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स सर्टिफिकेट, एमएस सीआयटी आणि संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  असिस्टंट लायब्रेरिअन पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये इतका पगार दिला जाईल. उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करावी लागेल.  उमेदवारांनी आपले अर्ज प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन नागपूर – 400001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 22 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज