मुलुंड रेल्वे स्टेशन तब्बल अर्धा तास अंधारात; प्रवाशांना आला भयानक अनुभव

काही तांत्रिक कारणामुळे रेल्वे स्थानकावरचा विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे लोकल फलाटावर लागल्यावर लोकलमध्ये चढताना आणि उतरताना अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे प्रवाशांना अंधारात चाचपडत लोकलमधून चढावे आणि उतरावे लागले. 

Updated: Nov 28, 2022, 11:09 PM IST
मुलुंड रेल्वे स्टेशन तब्बल अर्धा तास अंधारात; प्रवाशांना आला भयानक अनुभव title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकातून(Mulund railway station) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयानक अनुभव आला आहे. मुलुंड रेल्वे स्टेशन तब्बल अर्धा तास अंधारात(darkness) होते. मुलुंड रेल्वे स्थानकातूल विज पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड झाले. ऐन गर्दीच्या वेळेत हा गोंधळ झाल्याने प्रवासी संतापले. 

मुलुंड रेल्वे स्थानकावर तब्बल अर्धा तास बत्ती गुल झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. सात ते साडेसात या वेळेत तब्बल अर्धा तास मुलुंड रेल्वे स्थानक अंधारात होतं.  काही तांत्रिक कारणामुळे रेल्वे स्थानकावरचा विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे लोकल फलाटावर लागल्यावर लोकलमध्ये चढताना आणि उतरताना अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे प्रवाशांना अंधारात चाचपडत लोकलमधून चढावे आणि उतरावे लागले. 

सुदैवाने या काळात कुठलीही दुर्घटना घडली नाही. अर्ध्या तासानंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि रेल्वे स्थानकावरील विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यात आला. मुलुंड रेल्वे स्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याने रेल्वे प्रशासानाच्या  कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.