मुंबईतील ही २३ उद्याने २४ तास राहणार खुली

 मुंबईतील २३ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेसी यांनी दिेले

Updated: Sep 8, 2019, 08:11 AM IST
मुंबईतील ही २३ उद्याने २४ तास राहणार खुली  title=

मुंबई : मुंबईतील हॉटेल्स, दुकाने रात्रीही सुरु ठेवत नाईट कल्चर आणण्याच्या चर्चा सुरु असताना आता उद्यानेही सुरु राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या अख्त्यारितील ठराविक २३ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेसी यांनी दिेले आहेत. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. उद्याने २४ तास सुरु ठेवताना त्याच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. ही उद्याने खुली असतानाच त्यांचे परिरक्षण आणि देखभाल करण्याचेही निर्देश परदेशी यांनी दिले आहेत. 

मुंबई पालिकेच्या अख्त्यारित विविध भागात एकूण ७५० उद्याने येतात. यातील महत्त्वाच्या ठिकाणची २३ उद्याने २४ तास खुली राहणार आहेत. तसेच या उद्यानांच्या प्रवेशद्वारावर सुधारित वेळापत्रकही लावण्यात येणार आहे.

२४ तास खुली राहणारी २३ उद्याने

ए विभागातील कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान
सी विभागातील भगवानदास तोडी उद्यान
डी विभागातील टाटा उदयान
इ विभागातील अब्दुला बरेलिया उद्यान
एफ उत्तर विभागातील माहेश्वरी उद्यान
एफ दक्षिण विभागातील बिंदू माधव ठाकरे उद्यान
जी दक्षिण विभागातील आद्य शंकराचार्य उद्यान
जी उत्तर विभागातील आजी आजोबा उद्यान

पूर्व आणि पश्चिम उपनगर

एच पूर्व विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
एच पश्चिम विभागातील रावसाहेब पटवर्धन उद्यान
के पूर्व विभागातील श्री. साईलीला मनोरंजन मैदान
के पश्चिम विभागातील कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान
पी दक्षिण विभागातीलवेदप्रकाश चड्ढा उद्यान
पी उत्तर विभागातील स्वतंत्रता उद्यान
आर दक्षिण विभागातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान
आर मध्य विभागातीलगांजावाला उद्यान
आर उत्तर विभागातील जरी मरी उद्यान
एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
एम पूर्व विभागातील बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान
एम पश्चिम विभागातील डी. के. संधू उद्यान
एन विभागातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान
एस विभागातील शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान
टी विभागातील लाला तुळशीराम उद्यान