Gold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक

Gold smuggling News :  मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.  

Updated: Jan 28, 2023, 07:53 AM IST
Gold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक title=
Mumbai Airport Customs seized 8.3 Kg Gold in wax

Gold smuggling : सोने तस्करीची बातमी. मेणात लपवून आठ किलो सोने (Gold in wax) आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. (Mumbai News) 4.14 कोटी रुपयांचे सोने दुबईतून आणणाऱ्या आखाती नागरिकाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. (Mumbai Airport Customs seized 8.3 Kg Gold in wax form valued at Rs 4.14 Crore ) (Mumbai News in Marathi)

तब्बल 11 परदेशी नागरिकांना अटक

मेणाचे गोळे करत त्यात लपवून आणलेले 8 किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4 कोटी 14 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी तब्बल 11 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शारजा येथून मुंबईत आलेले हे प्रवासी सोनेची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या नागरिकांनी  मेणाच्या लहान गोळ्या करुन त्यात हे सोने लपवले होते. या मेणाच्या गोळ्या शरीरात लपविल्या होत्या.

दुबई एअरलाइनच्या विमानाद्वारे सोन्याची तस्करी

प्रजासत्ताक दिनी दुबईतून मुंबईत आलेल्या एका आखाती देशातील नागरिकाने तस्करीच्या माध्यमातून हे सोने आणले होते. दुबईतून मुंबईत येणाऱ्या फ्लाय दुबई एअरलाइनच्या विमानाद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि परदेशी व्यक्तीला अटक केली.

हा आखाती नागरिक विमानातून उतरुन ग्रीन चॅनलमधून बाहेर पडला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत, त्याची चौकशी केली. यानंतर, त्याच्याकडील सोने पावडर जप्त करत त्याला अटक केली.