बर्न व्हिक्टीम सिया पारकरची लव्ह स्टोरी..नक्की वाचा

 मुंबईतल्या सियाचीही अशीच काहीशी कहाणी...मात्र तिच्या आयुष्यात माही आला आणि सारं काही आलबेल झालं.

Updated: Dec 15, 2019, 09:14 PM IST
बर्न व्हिक्टीम सिया पारकरची लव्ह स्टोरी..नक्की वाचा title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : छपाक सिनेमाच्या माध्यमातून अँसिड हल्ल्याचं प्रकरण मोठ्या पडद्यावर साकारण्यात येतंय..अँसिड हल्ला असो..बर्न व्हिक्टीम असो...विद्रुप झालेल्या चेहऱ्याने वावरणं खूपच कठीण आहे. मुंबईतल्या सियाचीही अशीच काहीशी कहाणी...मात्र तिच्या आयुष्यात माही आला आणि सारं काही आलबेल झालं.

मुंबईची सिया पारकर आणि उत्तरप्रदेशचा महेश शर्मा ऊर्फ माही...सध्या दोंघांच्याही प्रेमाला अंकुर फुटलेत...आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय...आजकालचे तरुण प्रेमात तर पडणारचं मात्र याची लव्हस्टोरी थोडी हटके आहे.

९ वीत असताना कौटुंबिक कलहातून सियाला जाळण्याचा प्रकार झाला. यात तिचा चेहरा आणि शरीर आगीने प्रभावित झालं. पुढचे काही वर्ष ती नैराश्येत गेली. पण यातून सावरत तिने आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. ब्युटीशियनचा कोर्स केला. मॉडेलिंग क्षेत्रातही पाऊल टाकलं. आणि सध्या ती बर्न, अँसिड व्हिक्टीम महिलांसाठी उद्योजिकांचं प्रदर्शन भरवते.

महेश शर्मा हा देखील २४ वर्षांचा आहे. हेल्पिंग ह्यूमन या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून तो गरीब, गरजूंना सहाय्य करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीची सियाशी मैत्री झाली. आणि थेट सियाला लग्नाचीच मागणी घातली. 'चेहरा मायने नही रखता..उसका दिल बहोत खुबसुरत है', असे तो सियाबद्दल प्रेमाने सांगतो. जिथे हा समुद्र संपतो तितकं त्याहून जास्त आम्ही प्रेम करतो असेही तो अभिमानाने सांगतो. 

गेल्या अडीच वर्षांपासून या दोघांमध्ये हे नातं अधिक घट्ट होतं गेलंय. सिया माहीच्या युपीतल्या घरी देखील जाऊन आली...घरच्यांनीही तिला सून म्हणून मनोमन स्वीकारलं. त्यामुळे शिक्षण पूर्ण करुन लवकरच लग्नबंधनात अडकण्याचा त्यांचा विचार आहे.

मी मुंबईत लहानाची मोठी झाली. माही हा उत्तर प्रदेशातील एका गावचा आहे. मी दिल्लीला एका कामानिमित्त गेले असता त्याच्या घरच्यांना भेटले.  मला सुरुवातीला वाटलेलं हे जुन्या विचारांचे असतील पण त्यांनी मला स्वीकारलं. मी बर्न व्हिक्टीम असल्याचे त्यांनी कुठेही जाणवू दिले नाही. आम्हाला दोघांना मिळून दिव्यांगांसाठी काम करायचे असल्याचेही हे दोघे सांगतात. प्रेमाला सौंदर्याच्या व्याख्येत मापणाऱ्या अनेक तरुणांनी सिया आणि माहीकडून आदर्श नक्कीच घ्यायला हवा.