समलैंगिक APP वर ओळख, IITतील विद्यार्थ्याला बनवलं 'लैंगिक गुलाम' जादूटोणा करुन अनैसर्गिक अत्याचार

मुंबईतील पवईमधल्या आयआयटीतील विद्यार्थ्याला लैंगिक गुलाम बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, विशेस म्हणजे या प्रकारात आरोपीला पत्नीचीही साथ होती

Updated: Feb 13, 2023, 10:02 PM IST
समलैंगिक APP वर ओळख, IITतील विद्यार्थ्याला बनवलं 'लैंगिक गुलाम' जादूटोणा करुन अनैसर्गिक अत्याचार title=

Mumbai Crime News : मुंबईतून समलैंगिक अत्याचाराची (Homosexual Abuse) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या (Mumbai) पवईमधील आयआयटीतल्या (Indian Institute of Technology Mumbai) एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील एका उच्चशिक्षित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका समलैंगिक अॅपवर विद्यार्थ्याची ओळख या दाम्पत्याशी झाली होती. त्यानंतर त्या विद्यार्थ्यावर वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत त्याला 'लैंगिक गुलाम' (Sex Slave) बनवण्यात आलं. या प्रकरणी आरोपीला पत्नीचीह साथ होती. धक्कादायक म्हणजे विद्यार्थ्याच्या अंगावर चटके देत तांत्रिक सेक्स केल्याचंही समोर आलं आहे. 

विद्यार्थ्याला लैंगिक गुलाम बनवल्याची तक्रार
एका समलैंगिक अॅपवर या दाम्पत्याने पवई आयआयटीतल्या विद्यार्थ्याशी ओळख केली. हे दाम्पत्य उच्चशिक्षित असून त्यांनी विद्यार्थ्याशी ओळख वाढवली. आरोपी दाम्पत्य मुंबईतल्या भोईवाडा इथं उच्चभ्रू इमारतीत राहाणारं आहे. विद्यार्थ्याला घरी बोलवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार सुरु केले. हळूहळू त्याला मारहाणही करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर अंधश्रद्धेचे अघोरी प्रकारीही केले जात असल्याचं तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्याबरोबर तांत्रिक सेक्स
त्या विद्यार्थ्यांला प्रसाद खायला दिला जात होता, तसंच त्याच्या अंगाला अंगारा लावून त्याचे हात पाय बांधून मेणबत्तीचे चटके दिले जात होते. विद्यार्थ्याला सेक्स स्लेव्ह बनवल्याची तक्रार पोलीस तपासात समोर आली आहे.  विद्यार्थ्याच्या हातात, गळ्यात विविध दोरे बांधण्यात आले होते. हातावर कापूर जाळून विद्यार्थ्याबरोबर सेक्स केला जात होता.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल
आरोपींविरोधात पवई पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दाम्पत्यावर पवई पोलिसांनी  377, 370,  307, 506, 504 कलम लावले आहेत.