Mumbai Crime | 'बलात्कारा'ची किंमत लावली ३० लाख रुपये, पीएसआयला अटक, पीआय रजेवर

मुंबईत ना.म.जोशी पोलीस स्टेशनला बलात्काराचा सौदा झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील चांगली लोकं देखील हादरली आहेत. बलात्कारात महिलेचं झालेलं शारीरिक

Updated: Mar 9, 2022, 06:44 PM IST
Mumbai Crime | 'बलात्कारा'ची किंमत लावली ३० लाख रुपये, पीएसआयला अटक, पीआय रजेवर title=

मुंबई  : मुंबईत ना.म.जोशी पोलीस स्टेशनला बलात्काराचा सौदा झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील चांगली लोकं देखील हादरली आहेत. बलात्कारात महिलेचं झालेलं शारीरिक आणि मानसिक नुकसान, परस्पर पैशातून भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात एका पीएसआयला अटक करण्यात आली आहे. तर ना.म.जोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे हे रजेवर गेले आहेत. या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचं बोललं जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पीएसआय भरत लक्ष्मणराव मुंढे याला अटक केली आहे.७ लाख रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली आहे. मुंढे याला या कथित प्रकरणात ५ लाख रुपये हवे होते, तर वरिष्ठांसाठी २ लाख. 

महिला दिनी ही घटना उघड झाली आहे. एका महिलेने बलात्कार प्रकरणी बलात्काराची तक्रार देऊ नये, कारण तिलाही सहआरोपी करण्याची शक्यता दाट आहे. तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार आणि तिचे शारिरीक मानसिक नुकसान हे पैशांच्या स्वरुपात भरुन काढू, पण त्या बदल्यात तिला ३० लाख, समज काढणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या पीएसआयला ७ लाख, ७ लाखांपैकी २ लाख वरिष्ठाला असा प्लान ठरला असं आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

अटकेत असलेला पीएसआय भरत मुंढे याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, या प्रकरणाचा तपास देखील दुसऱ्याकडे होता. पण ज्या तक्रारदाराच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल झाल्याने, या प्रकरणात मुंढे यांच्याकडून काही मार्ग निघू शकतो का? अशी चाचपणी तक्रारदाराकडून सुरु होती.

बलात्काराचा आरोपी मालदार पार्टीतला आहे, हे पीएसआयला समजले. यानंतर बलात्काराची तक्रार करणाऱ्या आरोपीलाही तुम्हाला सहआरोपी करु, असं सांगून घाबरवून सोडले. संबधित गुन्ह्यात तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होवू नये, यासाठी तक्रारदाराची समज घालून, संबंधित बलात्कार पीडितास ३० लाख रुपये देऊ असं पीएसआयने म्हटल्याचं लेखी तक्रारीत आहे.

तसेच पीएसआय मुंढेसाठी ५ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी २ लाख द्यावे लागतील. एकूण हे प्रकरण ३७ लाखात संपवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण ७ लाख रुपये घेताना पीएसआय भरत लक्ष्मणराव मुंढे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. 

मुंढे याने २ लाखांसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव घेतल्याने ते अडचणीत आले आहेत. पण खरोखर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे किंवा नाही याची शहानिशा पोलिसांच्या तपासात होणार आहे.