लोकांचे जीव जात असतानाही खड्डे का बुजवले जात नाहीत? - हायकोर्ट

राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांचे जीव जात असताना सरकार खड्डे का बुजवत नाही असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय. 

Updated: Sep 28, 2017, 06:05 PM IST
लोकांचे जीव जात असतानाही खड्डे का बुजवले जात नाहीत? - हायकोर्ट title=

मुंबई : राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांचे जीव जात असताना सरकार खड्डे का बुजवत नाही असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय. 

खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयंत का? असा प्रश्नही न्यायालयानं केलाय. राज्यातल्या पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा, नगरपालिका आणि महापालिकांनी खड्डे का बुजवले नाहीत याचं उत्तर द्यावं असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. यासंदर्भात पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला आहे.