मुंबई : तुम्ही जर रविवारी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आजच लोकलच वेळापत्रक पाहा. याचं कारण उद्या मेगाब्लॉक असल्याने तुमची तारांबळ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही रविवारी बाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक न घेता रात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकात काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी 21 आणि 22 मे रोजी रात्री गोरेगाव आणि सांताक्रूझ स्टेशनवर रात्री 12 ते पहाटे 4 ब्लॉक असणार आहे. या कालावधीसाठी फास्ट लाईनवरच्या गाड्या स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्रीही ब्लॉक असणार आहे. ध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर 21 मे रोजी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि भायखळा- माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. गाड्या 10 मिनिटं उशिराने चालणार आहे.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेलला 10.33 पासून ब्लॉक सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा स्थगित करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील.