Mumbai MegaBlock | मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार, जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतुकीच्या देखभालीसाठी रविवारी (ता.9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

Updated: May 7, 2021, 07:10 PM IST
Mumbai MegaBlock | मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार, जाणून घ्या सविस्तर title=

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतुकीच्या देखभालीसाठी रविवारी (ता.9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घेऊया रविवारी कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक 

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर लाइन मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान...

 चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान... 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / वडाळा रोड येथून डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून डाउन हार्बर मार्गावरील सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव करीता  सुटणा-या उपनगरी सेवा रद्द राहतील.
 
अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणा-या आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणा-या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस - कल्याण विभागात  मुख्य लाईनवर कोणतीही मेगा ब्लॉक परिचालीत केला जाणार नाही.