डी कंपनीचे काळे मनसुबे उधळले, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त

आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी, तुमच्या खिशात असलेल्या नोटा एकदा तपासून पाहा, हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

Updated: Jan 27, 2022, 10:30 PM IST
डी कंपनीचे काळे मनसुबे उधळले, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त  title=

मुंबई : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी, तुमच्या खिशात असलेल्या नोटा एकदा तपासून पाहा, हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. या एखाद्या बँकेतील स्ट्राँगरूममध्यल्या नोटा नाहीत. हे आहे बनावट नोटांचं घबाड. 2 हजारांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला दहीसरमधून अटक करण्यात आली आहे. (mumbai police crime branch arrest 7 person with seized 7 crore fake currency notes) 

पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यात एकदोन नव्हे तर दोन हजारांच्या तब्बल 7 कोटींच्या नोटा हाती लागल्या. पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

बनावट नोटांच्या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. या टोळ्या पाकिस्तानच्या इशाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बोगस नोटा छापत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, आयएसआयनं पाकिस्तानमध्ये लपलेला डी गँगचा म्होरक्या दाऊद इब्राहिम याच्यावर बनावट नोटा बनवण्याची जबाबदारी सोपवली आहे. 500 आणि 2 हजारांच्या नकली नोटा पाकिस्तानातून सौदी आणि सौदीतून दिल्लीत पोहचवण्याचा कट आखण्यात आला आहे. याशिवाय समुद्रीमार्गेही या नोटा भारतात पाठवल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयानं या बनावट नोटांबाबत सजग राहण्याची गरज आहे.

बनावट नोटा कशा ओळखाल?

बऱ्याचदा नोटांच्या कागदावरून नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येते.

नोटेवर देवनागरीमध्ये 2000 ही संख्या लिहिलेली असेल आणि मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र आहे.

खऱ्या नोटांवर छोट्या लिपीमध्ये भारत आणि इंडिया लिहलेलं आहे.

नोटेच्या पुढच्या बाजूला असलेल्या धाग्यावर भारत, आरबीआय आणि 2000असं लिहिलेलं आहे.

खऱ्या नोटेला एका बाजूला वाकवल्यानंतर धाग्याचा हिरवा रंग निळ्या रंगात बदलतो.