चहा पिताय? सावधान! भेसळयुक्त चहा पावडर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. अनेकांची चहा घेण्याची वेळ नसली तर वेळेला चहा लागतोच. 

Updated: May 16, 2022, 07:59 PM IST
चहा पिताय? सावधान! भेसळयुक्त चहा पावडर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश title=

मुंबई : अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. अनेकांची चहा घेण्याची वेळ नसली तर वेळेला चहा लागतोच. ही बातमी अशाच चहा शौकिन असलेल्यांसाठी आहे. तुम्ही जो चहा पिता तो भेसळयुक्त चहा असू शकतो. कारण मुंबई पोलिसांनी भेसळयुक्त चहापावडर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. (mumbai police raided shivdi bunder road and seized 430 kg of adulterated tea powder)

मुंबई पोलिसांनी छापा टाकत  1, 2 नव्हे तब्बल 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. बाजारात या भेसळयुक्त चहाची किंमत 85 हजार इतकी आहे. 

पोलिसांनी शिवडी बंदर रस्त्यावर छापा टाकत ही भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. 

राजू अबुल अजहर शेख आणि राहुल शेख असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. हे दोघे कुणाकुणाला या भेसळयुक्त चहाचा पुरवठा करत  होते, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.