महिलांनो सावधान| मेकअपचं करतोय तुमच्या चेहऱ्याचा घात

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोरेगाव, दाणाबंदर, क्रॉफर्ड मार्केटमध्ये छापा टाकून तब्बल साडेतीन कोटींचा साठा हस्तगत केलाय.  

Updated: Sep 29, 2022, 11:51 PM IST
महिलांनो सावधान| मेकअपचं करतोय तुमच्या चेहऱ्याचा घात title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : आता महिलावर्गासाठी (Womens) अतिशय महत्वाची बातमी. चेहरा सुंदर दिसण्यासाठी (Beauty Products) तुम्ही पावडर, क्रीम किंवा इतर सौंदर्यप्रसाधनं वापरता. मात्र ही सौंदर्यप्रसाधनं खरेदी करताना त्यांची मुदत संपली तर नाही ना? याची खातरजमा करून घ्या. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी महिला पार्लरमध्ये जातात, नियमितपणे सौंदर्यप्रसाधनं वापरतात. पण हीच सौंदर्यप्रसाधनं चेहरा सुंदर करण्याऐवजी चेहरा खराबही करू शकतात. (mumbai police seized stock of expired cosmetics products at  goregaon danabandar and crawford market)

कारण मुंबईत कालबाह्य झालेल्या सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोरेगाव, दाणाबंदर, क्रॉफर्ड मार्केटमध्ये छापा टाकून तब्बल साडेतीन कोटींचा साठा हस्तगत केलाय. अशी कालबाह्य सौंदर्यप्रसाधनं विकल्याप्रकरणी पोलिसांनी एका कंपनीमालकालाही ताब्यात घेतलंय. 

नॅशनल इम्पेक्स आणि एम. एस. इंटरनॅशनल या कंपन्या परदेशातून आयात केलेल्या उत्पादनाच्या वैधता तारखेत फेरफार करून त्यांची विक्री करायच्या. गोरेगाव, दाणाबंदर, क्रॉफर्ड मार्केट याठिकाणी कंपन्यांच्या गोदामांमध्ये उत्पादनांच्या तारखेत खाडाखोड केली जायची. पोलिसांनी छापा मारत याठिकाणांवरून क्रीम, पावडर, केसांना लावण्याचे रंग अशा वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केलाय. त्यामुळे बाजारातून सौंदर्य प्रसाधनं खरेदी करताना काळजी घ्या...नाहीतर झटपट सुंदर होण्याच्या नादात तुम्ही तुमचं आहे ते सौंदर्यही गमावू शकता.