चोरीची शिक्षा मृत्यू : खांबाला बांधून लाधाबुक्क्यांनी मारहाण

 या मारहाणीत सैजाद खान या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

Updated: Dec 27, 2020, 02:13 PM IST
चोरीची शिक्षा मृत्यू : खांबाला बांधून लाधाबुक्क्यांनी मारहाण title=

मुंबई : सांताक्रूझमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली. पालिकेचं हे मैदान म्हणजे गर्दुल्ल्यांचा अड्डा आहे. इथं आलेल्या सैजाद खान नावाच्या तरुणाला तिथला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधलं. त्यानंतर काठी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.. या मारहाणीत सैजाद खान या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलीय.

बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने सांताक्रूझ परिसरात खळबळ पसरलीय. मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली असून लोखंडी खांबाला बांधून काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. बेदम मारहाणीत सैजाद खान याचा मृत्यू झाला. सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केलीय. सैजादच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीय. 

पालिकेचं मुक्तानंद पार्क आहे नशेचा अड्डा बनलंय. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार देखील करण्यात येते. आतापर्यंत अनेकांना मुकादमच्या सांगण्यावरून कामगारांनी बेदम मारहाण करण्यात आलीय.