close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' - आदित्य

निकाल लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशाला मुकावे लागलं आहे. त्यामुळे आता निकालबंदी करून टाकावी. 

Updated: Sep 2, 2017, 07:14 PM IST
'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' - आदित्य

 मुंबई : मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी अशा शब्दांत, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाला निकालाबाबतच्या त्यांच्या हलगर्जीपणावरुन डिवचलं आहे. 

निकाल लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशाला मुकावे लागलं आहे. त्यामुळे आता निकालबंदी करून टाकावी. 

मुंबई विद्यापीठाविरोधात आंदोलनं करुनही काही फायदा होत नाही, त्यामुळे आता आंदोलनं करण्याचीही लाज वाटू लागली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.