मुंबई : मुंबई विद्यापीठातील विभाग प्रमुखांचा प्रशिक्षण शिबीर अचानक रद्द करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. मुंबई विद्यापीठ विभाग प्रमुखांचं प्रशिक्षण शिबीर शुक्रवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरू झालं. शनिवारी सकाळच्या सत्रातील प्रशिक्षण पार पडल्यानंतर दुपारी अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यानं इथं प्रशिक्षण घेऊ नये, असा आक्षेप काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी घेतला होता.
त्यानंतर शनिवारी सकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांचा दूरध्वनी आल्यानं प्रशिक्षण रद्द करण्यात आलं, अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी दिली. यामुळं नवा वाद सुरू झाला आहे.