मुंबई : Air pollution in South Mumbai : बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी. त्यामुळे प्रत्येकांना काळजी घेण्याची गरज आहे. कारण दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा विषारी असल्याचे समोर आले आहे. कुलाबातील हवेतील प्रदूषण (Air pollution) 345 वर पोहोचले आहे. हिवाळ्याची चाहूल लागत असताना हवा प्रदूषणाची बातमी समोर आली आहे. तसेच तापमानात अचानक वाढ झाली आहे. (Mumbai's air is more toxic than Delhi's, the report reveals shocking information)
हे प्रदूषण दिल्लीपेक्षाही अधिक आहे. सध्या दिल्लीत 331वर प्रदूषण पोहोचले आहे. हवेचा कमी वेग, बाष्प आणि कमी तापमान यामुळे दक्षिण मुंबईत प्रदूषण वाढले आहे. तसेच वाहनांमुळेही प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याबाबतची माहिती सफर या संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या.
मुंबईतल्या नागरिकांचे प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता
अस्थमा पेशंट असलेल्यांनी बाहेर फिरू नका,
लहान मुलं, वयोवृद्ध नागरिकांनी घराबाहेर पडू नये
मास्क न लावता फिरू नका
- प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावावे लागेल
- ट्रान्सपोर्ट, इमारतींचं बांधकाम काही काळासाठी बंद ठेवावं लागेल
- MMR रिजनचा प्रदुषणाचा अॅक्शन प्लॅन तयार करणं गरजेचे