नवदुर्गा : समाजाचे आयुष्य निरोगी ठेवू पाहणाऱ्या ' रान माई'

नवरात्रोत्सवाचं दुसरं फूल

Updated: Oct 18, 2020, 03:20 PM IST
नवदुर्गा : समाजाचे आयुष्य निरोगी ठेवू पाहणाऱ्या ' रान माई' title=

मुंबई :नवरात्री स्पेशलमध्ये आपण आज दुसरं फूल अर्पण करत आहोत. प्रत्येक स्त्रीचं एक वेगळेपण आहे कधी ती हळूवारपणे नातं सांभाळते तर कधी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था. आपण अशाच एका महिलेचं कार्य बघणार आहोत. जी गेली अनेक वर्षे रानभाज्यांचे संगोपन करून, समाजाचे आयुष्य निरोगी ठेवू पाहणाऱ्या ह्या रान माई, म्हणजे जणू माणसातील देवच...

औषधी रानभाज्यांचा संगोपन करून त्या गावातील लोकांना औषधोपचारासाठी मोफत देणाऱ्या रानबाई म्हणजेच माया शृंगारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'नेरूर' गावात राहणाऱ्या 'माया शृंगारे' यांनी आपल्या शेतात अनेक औषधी वनस्पतींचे संगोपन करून त्यांचे जतन करण्यासाठी काम गेली अनेक वर्षे करत आहेत. 

त्यांच्या या कार्याचा अनेकांना लाभ झाला आहे. एक बाजूला रानभाजी जतन केली जाते तर दुसरीकडे त्याचा वापर योग्य पद्धतीने कसं केलं जातं ते सांगितलं जातं.