नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप, ट्विट करून दिली धक्कादायक माहिती

समीर वानखेंडेच्या जन्म दाखल्यावर नवा वाद 

Updated: Oct 25, 2021, 10:18 AM IST
नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप, ट्विट करून दिली धक्कादायक माहिती

मुंबई : समीर वानखेडेच्या संदर्भातील  ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे. लागोपाठ केलेल्या दोन ट्वीटमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटात समीन वानखेडेंचा फोटो ट्वीट करत त्यांनी पहचान कौन? अशा आशयाचे ट्वीट आहे. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा आहे.त्या आधी आणखी एक ट्वीट करतांना वानखेडेंच्या जन्मदाखली ट्वीट केला आहे. 

या ट्वीट द्वारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक बाब समोर आणली आहे. मलिक यांनी वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला असून समीर दाऊद वानखेडे यांचा इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा) असे ट्विट केले आहे. या जन्माच्या दाखल्यावर खाडाखोड केलेली दिसून येत आहे.

समीर वानखेडेंसह 6जणांविरोधात तक्रार दाखल 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह 6 जणांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ऍडव्होकेट जयंत कनिष्क यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आर्यनचं अपहरण करुन खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप कनिष्क यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबईतील MRA पोलीसस्टेशन, यलोगेट पोलीस स्टेशन तसंच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेंडेवर गंभीर आरोप 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा हा व्हिडिओ आहे. ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील जवळपास फायनल झाली होती. शाहरूख खानच्या मॅनेजरसोबत मिटिंग देखील झाली होती. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.

समीर वानखेंडेंनी आरोप नाकारत लिहिलं पत्र 

डील झाल्याचे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. अज्ञात व्यक्तींकडून कायदेशीर कारवाईचा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाव्य कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळावं अशी मागणी वानखेडे यांनी पत्रातून केली आहे.