NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना, दीपिकाची केली होती चौकशी

दीपिकाची केली होती साडे पाच तास चौकशी 

Updated: Oct 4, 2020, 08:31 AM IST
NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना, दीपिकाची केली होती चौकशी  title=

मुंबई : बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन असल्याच्या तपासात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला पुन्हा गेले आहेत. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा संबंध आणि ड्रग्स कनेक्शनशी असल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहरे हे NCB च्या रडारवर आहेत. नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोणष श्रद्दा कपूर आणि सारा अली खानची चौकशी झाली आहे. यामध्ये NCB एसआयटी टीमने दीपिकाची कसून चौकशी केली होती. या टीममध्ये केपीएल मल्होत्रा लीड करत होते. 

२६ सप्टेंबर रोजी दीपिकाची साडे पाच तास चौकशी झाली. यावेळी तिला सुशांत सिंह राजपूत आणि रियाशी संबंधित प्रश्न विचारले गेले. NCB चा संपूर्ण फोकस दीपिका आणि तिची एक्स मॅनेजर करिश्मासोबत झालेल्या चॅटवर होता. दीपिकाने देखील या चॅटबद्दल कबुली केली. 

NCB च्या चौकशीत दीपिकाला ड्रग्स आणि 'त्या' चॅट संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दीपिका आणि करिश्मा प्रकाशला एकमेकींसमोर बसून ड्रग्स चॅटवर प्रश्न विचारण्यात आले. याच दरम्यान दीपिकाला रडू कोसळलं. 

NCB च्या अधिकाऱ्यांना दोघींनीही एकच गोष्ट सांगितली. वीडच्या प्रश्नावर सांगितलं की, ही अतिशय साधी रोल्ड सिगरेट आहे ज्यामध्ये तंबाखू भरून ओढली जाते. आणि कोड भाषेत याला हॅश किंवा वीड म्हटलं जातं. 

NCBने विचारलेल्या प्रश्नांमुळे दीपिकाने आधी खूप घाबरली. गोलगोल उत्तर देत राहिली. मात्र प्रश्नांचा ओघ सुरूच होता तेव्हा दीपिकाला अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. ड्रग्स प्रकरणावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने असे असे प्रश्न विचारले की, दीपिकाला आपलं रडणंच आवरता आलं नाही. दीपिकाने मात्र अद्याप NCB ला सत्य सांगितलं नाही. त्यामुळे आता तिचा मोबाईल जप्त केला गेला आहे.