मुंबईत NCBची छापेमारी, 3 अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

 नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान एनसीबीने छापे टाकले. (NCB raid in Mumbai) मुंबईतल्या वरळी, अंधेरी भागात एनसीबीने धाड टाकली.  

Updated: Jan 1, 2021, 12:19 PM IST
मुंबईत NCBची छापेमारी, 3 अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान एनसीबीने छापे टाकले. (NCB raid in Mumbai) मुंबईतल्या वरळी, अंधेरी भागात एनसीबीने धाड टाकली. या छाप्यात तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.(NCB raid in Mumbai, 3 drug dealers arrested) त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. 

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करण्यावर भर दिला आहे. याआधी एजाज लकडावाला अटक करण्यात आली होती. तसेच अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. काल गुरुवारी रात्री पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. नारकोटिकस कंट्रोल ब्युरोने मुंबईत विविध ठिकाणी धाड टाकून अमली पदार्थ आणि अमली पदार्थ विक्रेत्याना अटक केल्यानंतर नारकोटिकस कंट्रोल ब्युरोने अंधेरी आणि वरळी येथे धाड टाकत तीन अमली पदार्थ विक्रेत्याना अटक केली.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) ड्रग्ज प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे. ती अद्याप सुरुच आहे. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेकांची  चौकशी करत आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली आहे.   

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी डीनो मोरिया, अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची नावे घेण्यासाठी एनसीबी दबाव टाकत असल्याची कबुली क्षितिज प्रसादने दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहेत. २५ सप्टेंबरला शुक्रवारी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर ड्रग्स प्रकरणी २६ सप्टेंबरला क्षितिजला अटक करण्यात आली.