मुंबई : Drugs case : ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई करण्यात येत आहे ती ठरवून केली जात आहे. NCB ठरवून खोट्या केसेस करत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede) यांनी केलेली कारवाई ही बनावट होती, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. याबाबत वानखेडे यांनी करण्यात आलेल्या पंचनाम्याची माहिती द्यावी, असे प्रति आव्हान मलिक यांनी दिले. तसेच NCBने फ्लेचर पटेलसोबत लेडी डॉन कोण आहे, याचा खुलासाही त्यांनी करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. एनसीबीचे अधिकारी वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांचे काय संबंध आहेत, ते त्यांनी सांगावे. मलिक यांनी ट्विट करतना फ्लेचर पटेल आणि वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फ्लेचर पटेलसोबत लेडी डॉन कोण आहे, अशी विचारना मलिक यांनी केली आहे. मलिक यांनी पत्रकार परिषद घेत NCBबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
This is Fletcher Patel pic.twitter.com/6LgYV4NIWd
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
याआधी मलिक यांनी के. पी. गोसावी, मनिष भानुशाली कसे NCBला मदत करतात आणि कार्यालयात येतात याबाबत खुलासा केला होता. दरम्यान, NCBच्या स्वतंत्र पंचाबाबत बोलत आहेत. परंतु फ्लेचर पटेल कोण आहेत ? वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत काय संबंध आहेत ? प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. ज्या ठिकाणी घटना घडते, तिथला प्रतिष्ठित नागरिक आणि तिथल्या नागरिकांना पंचनामा म्हणून नियमानुसार करायला पाहिजे. NCBने तीन केसेसमध्ये, यामध्ये स्वतंत्र पंचाबाबत माहिती घेतली असता एकच पंचनामा केल्याचे दिसत आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला.
Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.
Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
NCBच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दोन तारखेच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो, असे सांगितले होते. मग वानखेडे या अधिकाऱ्यासोबत फोटो कसे? स्वतंत्र पंच असल्याचे NCBने सांगितले असून आज याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. NCBने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे, अशी विचारणा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
- पहिली केस धाड टाकली, माल जप्त केला
- दुसरी केस सर्च ऑपरेशनमध्ये फ्लेचर पटेलच पंच
- तिसऱ्या केसेसमध्येही तोच पंच कसा?
- कुटुंबातील नागरिक पंच मिळवून देत आहेत का ?
- तीन केसेसमध्ये एकच व्यक्ती पंच कसे याबाबत वानखेडे यांनी उत्तर देणे गरजेचे आहे.
- ही लेडी डॉन कोण आहे? Film industry मध्ये दहशत निर्माण करत आहेत का ? काय करत आहेत हे लोक ?
- ठरवून खोट्या केसेस करत आहेत
- कुटुंबच केसेस करत आहेत
- लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करते?
- वानखेडे यांच्या बहिणी आहेत असं काहीजण म्हणत आहेत, वानखेडे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत का?
- या पंचबाबत वानखेडे यांनी खुलासा केला पाहिजे. वरील कारवाई फर्जी होती. तर - के पी गोसावी फरार आहे.