नवी मुंबई, पनवेलमध्ये आज पाणीपुरवठा बंद; किती तासांसाठी सोसावा लागणार त्रास?

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोसावा लागणार पाणीकपातीचा त्रास.   

सायली पाटील | Updated: Oct 9, 2023, 07:05 AM IST
नवी मुंबई, पनवेलमध्ये आज पाणीपुरवठा बंद; किती तासांसाठी सोसावा लागणार त्रास? title=
no water supply in Navi Mumbai latest Marathi news

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. कारण, समाधानकारक पाऊस आणि धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानासुद्धा येथील नागरिकांना पाणीकपातीलाचा सामना करावा लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या माहितीनुसार सोमवारी (आज) नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत कामं , स्थापत्य कामं आणि मुख्य जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीनं हाती घेत ते पूर्ण करण्यासाठी म्हणून शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

फक्त नवी मुंबईच नव्हे, तर पनवेल मधील नवीन पनवेल, कळंबोली , खांदा कॅालनी , काळुंद्रे, करंजाडे भागात पाणी पुरवठा तब्बल 36 तासांसाठी बंद राहणार आहे. सोमवारी 9 ॲाक्टोबर सकाळ 9 वाजल्या पासून मंगळवारी 10 ॲाक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. शहरातील पाणीपुरवठा बंद राहण्याच्या या वेळा पाहता आता पनवेलकर आणि नवी मुंबईतील नागरिकांनी पाणी साठ्याचं नियोजन करावं असंच आवाहन यंत्रणांनी केलं आहे. त्यामुळं आज पाणी जपूनच वापरा! 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण मुद्दा

तिथं नवी मुंबईत येत्या काळात देशातील आणि मुंबईला लागूनच असणाऱ्या काही मोठ्या Business Park ची सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. शिवाय इथं असणाऱ्या विमानतळामुळंही येत्या काळात या भागात बरेच बगल पाहायला मिळतील. पण, तत्पूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण मुद्दा मात्र लक्ष वेधताना दिसत आहे. 

विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. विमानतळ कृती समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली माहिती. राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेत ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला. दि बा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय एव्हिएशन विभागाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. ज्यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच दि बा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.