अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राचे हे जुनं ट्विट होतंय व्हायरलं

राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटक झाली आहे.

Updated: Jul 20, 2021, 05:21 PM IST
अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राचे हे जुनं ट्विट होतंय व्हायरलं title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याचं 9 वर्षापूर्वीचं ट्विट आता व्हायरल होत आहे. अश्लील चित्रपटाच्या एका प्रकरणात अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाले आहे.

45 वर्षांच्या राज कुंद्राने या ट्विटमध्ये प्रश्न केला होता की, पोर्नोग्राफी कायदेशीर आहे तर मग वेश्याव्यवसाय का नाही?

"पोर्न विरुद्ध वेश्या व्यवसाय. एखाद्याला कॅमेर्‍यावर लैंगिक संबंधासाठी पैसे देणे कायदेशीर आहे? मग दुसरे कसे वेगळे आहे?" "राज कुंद्रा याने मार्च 2021 मध्ये हे ट्विट केले होते. 

अश्लील कंटेंट प्रकाशित आणि प्रसारित करण्याविरूद्ध देशात कठोर कायदे आहेत, जरी खाजगीपणे अश्लील साहित्य पाहणे कायदेशीर आहे. वेश्या व्यवसायावरील कायदे अनेक वर्षांपासून अस्पष्ट आहेत. काळानुसार, देशात लैंगिक कामगार आणि त्यांच्या मुलांचे शोषण होऊ नये म्हणून वेश्या व्यवसायाचे कायदेशीररीत्या समर्थन करणारे लोक वाढत आहेत.

पोर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याचे निकटवर्तीय रायन थॉर्पेला आज अटक करण्यात आली.

अभिनयाची संधी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अश्लील फिल्म करण्यास भाग पाडल्याबद्दल एका महिलेने गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात पोलिसांनी श्री कुंद्रा यांना “मुख्य सूत्रधार” म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले.

राज कुंद्रा यांनी याप्रकरणात त्यांच्यावरील आरोप नाकारले असून याप्रकरणी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी आयपीएलच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाशी संबंधित असलेले राज कुंद्रा यांचं नाव चौकशीत पुढे आलं. एका युकेच्या कंपनीमार्फत अश्लील व्हिडिओ अपलोड होत होते. या प्रकरणात अटक केलेल्या एका व्यक्तीने चौकशीत राज कुंद्रा यांचं नाव घेतलं. कुंद्रा आणि त्याचा भाऊ यांनी ही कंपनी स्थापन केली आणि ब्रिटनमध्ये नोंदणी केली, जेणेकरुन भारतीय सायबर कायद्यांपासून बचाव होईल.

अश्लील चित्रपटाचे चित्रिकरण भारतात करण्यात आले होते, व्ही ट्रान्सफरचा वापर करुन ते यूकेला हस्तांतरित केले होते आणि पेड मोबाइल अ‍ॅप्सवर प्रदर्शित केले गेले होते. या चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईत भाड्याने घेतलेल्या घरात आणि हॉटेलमध्ये होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मॉडेल्सला चित्रपटाच्या ऑफरच्या आश्वासनाखाली या व्हिडिओमध्ये काम करायला सांगितले जायचे. पॉर्न शूट करण्यास भाग पाडले जात होते. असं ही चौकशीत समोर आले आहे.