वाशीमध्ये पादचारी पूल क्रेनवर कोसळला

मुंबईकडून पनवेलकडे येणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. 

Updated: Oct 7, 2018, 10:04 PM IST
वाशीमध्ये पादचारी पूल क्रेनवर कोसळला title=

नवी मुंबई: वाशीच्या खाडीपुलाजवळ वापरात नसलेला पादचारी पूल हटवताना क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला. सायन-पनवेल महामार्गावरील हा पूल गेल्या काही वर्षांपासून वापरात नव्हता. मध्यंतरी एका ट्रकने या पुलाला धडक दिली होती. त्यावेळी पुलाचा बाजूचा भाग काढण्यात आला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रेनच्या सहाय्याने पुलाचा उर्वरित भाग हटवण्याचे काम सुरु होते. मात्र, हे काम सुरु असतानाच हा पूल क्रेनवर कोसळला.

या दुर्घटनेमुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. सध्या दुसरी क्रेन मागवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. काही वेळापूर्वीच मुंबईकडून पनवेलकडे येणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.