अहमद पटेल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष

Updated: Nov 25, 2020, 01:58 PM IST
अहमद पटेल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली  title=

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. . पहाटे साडे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभरापासून अहमद पटेल यांची कोरोनाशी (COVID19) झुंज सूरू होती. मात्र त्यांच्याकडून उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अहमद पटेल यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली.